logo

Chimbh Bhijalele (From "Bandh Premache")

logo
الكلمات
ह्या रिमझिम झिरमिर पाऊसधारा

तन मन फुलवून जाती …

ह्या रिमझिम झिरमिर पाऊसधारा

तन मन फुलवून जाती …

सहवास तुझा मधुमास फुलांचा

गंध सुखाचा हाती..

हा धुंद गार वारा

हा कोवळा शहारा

उजळून रंग आले

स्वच्छंद प्रीतीचे

चिंब भिजलेले रूप सजलेले

बरसुनी आले रंग प्रीतीचे …

चिंब भिजलेले रूप सजलेले

बरसुनी आले रंग प्रीतीचे …

ओढ जागे राजसा रे अंतरी सुख बोले...

सप्तरंगी पाखरू हे, इंद्रधनू बघ आले

लाट हि, वादळी, मोहुनी गाते..

हि मिठी लाडकी मोगरा होते....

पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे..

दाही दिशांत गाणे, बेधुंद प्रीतीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले,

बरसुनी आले रंग प्रीतीचे...

चिंब भिजलेले, रूप सजलेले,

बरसुनी आले रंग प्रीतीचे...

हे फुल ओले..पंख झाले..रूप हे सुखाचे..

रोमरोमी जागले हे गीत मधुस्वप्नाचे..

बरसतो मोगरा थेंब गंधाचे..

भरजरी वेड हे ताल छंदाचे...

घन व्याकूळ रिमझिमणारा...

मन अत्तर दरवळणारा...

हि स्वर्गमुखाची दारे..हे गीत प्रीतीचे...

चिंब भिजलेले, रूप सजलेले,

बरसुनी आले रंग प्रीतीचे..

चिंब भिजलेले, रूप सजलेले,

बरसुनी आले रंग प्रीतीचे..