huatong
huatong
arun-date-jenva-tuzi-ni-mazi-chorun-bhet-zali-cover-image

jenva tuzi ni mazi chorun bhet zali

Arun Datehuatong
emandme5huatong
الكلمات
التسجيلات
जेव्हा ..

जेंव्हा तिची नी माझी

चोरुन भेट झाली

झाली फुले कळ्यांची,

झाडे भरात आली

जेंव्हा ..

जेंव्हा तिची नी माझी

हं हं हं हं ...

संगीत यशवंत दवे

दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले(२)

पाण्यात चांदण्याचे आभाळ सांडलेले

आभाळ सांडलेले

कैफात ..

कैफात काजव्यांची

अन पालखी निघाली

झाली फुले कळ्यांची,

झाडे भरात आली

जेंव्हा ..

जेंव्हा तिची नी माझी

हं हं हं हं ...

गित मंगेश पाडगांवकर

केसांतल्या जुईचा तिमीरास गंध होता(२)

श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता

आवेग अंध होता

वेड्या..

वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली

झाली फुले कळ्यांची,

झाडे भरात आली

जेंव्हा ...

जेंव्हा तिची नी माझी

हं हं हं हं ...

नव्हतेच शब्द तेंव्हा मौनात अर्थ सारे(२)

स्पर्शात चंद्र होता स्पर्शात लाख तारे

स्पर्शात लाख तारे

ओथंबला...

ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली

झाली फुले कळ्यांची,

झाडे भरात आली

जेंव्हा ..

जेंव्हा तिची नी माझी

हं हं हं हं ...

स्वर अरुण दाते

المزيد من Arun Date

عرض الجميعlogo