huatong
huatong
الكلمات
التسجيلات
हि वेळ निघून जाईल

हे दिवस रे आता सरतील

अंधारल्या जरी दिशा

हि चार घडी ची रे दशा

उगवेल सकाळ नव्याने

उभे राहू पुन्हा जोमाने

उजडेल पुन्हा तो दिवस नवा

उत्साही नव्या दिशा

चल जागवू मनात आशा

चल फुलवू नवीन आशा

जागवू रे मनात आशा

फुलवू मनात आशा

संकट हे आले जरी

भीड त्याला समोरी

फिरू नको तू माघारी

लढण्याची कर तू तयारी

दे जीवाला पुन्हा उभारी

राखेतून घे भरारी

तू थांबू नको तू खचू नको

झटकून टाक हि निराशा

चल जागवू मनात आशा

चल फुलवू नवीन आशा

जागव रे मनात आशा

फुलवू मनात आशा

المزيد من Keval walanj/Shubhangi Kedar

عرض الجميعlogo