huatong
huatong
avatar

6 December 56 Sali

Manohar Jadhavhuatong
༄мR᭄༒राजेंद्र✨मस्के༒huatong
الكلمات
التسجيلات
6 डिसेंबर 56... साली

वेळ कशी ती हेरली

6 डिसेंबर 56...साली

वेळ कशी ती हेरली

दुष्ट काळाने भिमरायाची

प्राणज्योत ती चोरली

दुष्ट काळाने भिमरायाची

प्राणज्योत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

The track update by

༄мR᭄༒राजेंद्र मस्के༒

टपून बसला होता काळ

कसा महापुरुषावरती

देशोदेशी वार्ता पसरता

हादरून गेली ही धरती

काळजातील हंस हरपला

दर्याला आली भरती

सूर्य बुडाला अंधार झाला

म्हणून जनता ही झुरती

प्रगतीचे ते युगे दिनाची

प्रगतीचे ते युगे दिनाची

गुपित मागे सारली

दुष्ट काळाने भिमरायाची

प्राणज्योत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

The track update by

༄мR᭄༒राजेंद्र मस्के༒

देश हिताच्या साठी लीहूनी

गेला कायद्याची गाथा

नमुन फक्त आयुष्यामध्ये

बुद्धा चरणी तो माथा

हरपली आई हरपली माई

हरपली माता अन पिता

वाली देशाचा निघून गेला

कोण होईल तईसा आता

वैरीण राती ची ती मर्जी...

वैरीण राती ची ती मर्जी

धुरंधरा वर्ती फिरली

दुष्ट काळाने भिमरायाची

प्राणज्योत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

The track update by

༄мR᭄༒राजेंद्र मस्के༒

सात कोटींचा प्रकाश गेला

झाली जीवाची लाही

भीमा पाटी या जगात आता

वाली उरलेला नाही

असे म्हणूनी दलित सारे

रडू लागले धायी धायी

चैत्य भूमि च्या ठिकाणी अश्रू

गंगे सवे नयनी वाही

असून कोटी पीले तरीही...

असून कोटी पीले तरीही

भीमा मूर्ती ना तारली

दुष्ट काळाने भिमरायाची

प्राणज्योत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

The track update by

༄мR᭄༒राजेंद्र मस्के༒

हर्ष कोपले सुख लोपले

बाळाचे अन आई चे

थोर उपकार देशावरती

आहे भिमाच्या शाईचे

महा मानवांने ते केले

कृत्य असे नवलाईचे

बुद्ध धम्माचे रोप लाऊनी

फुले उमलली जाईचे

लढा देऊनी गुलामगिरीला...

लढा देऊनी गुलामगिरीला

अंधश्रद्धा ती मारली

दुष्ट काळाने भिमरायाची

प्राणज्योत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

The track update by

༄мR᭄༒राजेंद्र मस्के༒

शान जळता भारतभूची

चित्ते वरती पाहिली

पाहताक्षणी कालीनंदाने

श्रद्धांजली वाहिली

डब डबलेल्या अश्रूंनी ही

महिमा त्यांची गायली

अमर झाली भीमाची कीर्ती

डोळ्यांनी मी पाहिली

जाता जाता हृदयी आमच्या...

जाता जाता हृदयी आमच्या

मुर्ती बुद्धाची कोरली

दुष्ट काळाने भिमरायाची

प्राणज्योत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

6 डिसेंबर 56 साली

6 डिसेंबर 56 साली

वेळ कशी ती हेरली

दुष्ट काळाने भिमरायाची

प्राणज्योत ती चोरली

दुष्ट काळाने भिमरायाची

प्राणज्योत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

बुद्धम् शरणम् गच्छामि

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

नमो बुद्धाय जय भिम

?