मोहराच्या दारावरी कैऱ्या मागणं
हा, मोहराच्या दारावरी कैऱ्या मागणं
घाई बरी नाही, धीर धराना
रात गाते ज्वानीचा तराना
घाई बरी नाही, धीर धराना
रात गाते ज्वानीचा तराना
खुलू लागल्या ओठांच्या पाकळ्या
पडल्या पैंजनांच्या पायात साखळ्या
हा-आ, खुलू लागल्या ओठांच्या पाकळ्या
पडल्या पैंजनांच्या पायात साखळ्या
आरं, मोहराच्या दारावरी कैऱ्या मागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
ही रात शेंदरी, पायात भिंगरी
तुझ्या इशाऱ्याने ही काया रंगली
ही रात शेंदरी, पायात भिंगरी
तुझ्या इशाऱ्याने ही काया रंगली
गोड गुपिताने ही रात मंतरु
अंधार पांघरु, अंधार अंथरु
ए, स्वप्नात झोप ना, स्वप्नात जाग ना
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
पहिल्या धारेची, मी मोह फुलाची
झिंगविते राणी तुला तुझ्या दिलाची
पहिल्या धारेची, मी मोह फुलाची
रंगविते राणी तुला तुझ्या दिलाची
मस्तीमंदी नाचतंया एक पाखरू
डोलू लागलंया हवेचे लेकरू
मस्तीमंदी नाचतंया एक पाखरू
डोलू लागलंया हवेचे लेकरू
हे, पुन्हा-पुन्हा बावटळीच्या नादी लागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
घाई बरी नाही, धीर धराना
रात गाते ज्वानीचा तराना
घाई बरी नाही, धीर धराना
रात गाते ज्वानीचा तराना
अंगाला शहारा, बेधुंद पालवी
भेटीचा एक तारा अंधार घालवी
अंगाला शहारा, बेधुंद पालवी
भेटीचा एक तारा अंधार घालवी
मेणाची ही काया भोवती मशाली
ओठांनी विचारावे ओठांना खुशाली
हे, वाया घालवीती तरुण चांदण
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं
काय बाई एका-एकाचं वागणं