huatong
huatong
prahlad-shinde-naam-tujhe-gheta-deva-hoi-samadhan-cover-image

Naam Tujhe Gheta Deva Hoi Samadhan

Prahlad Shindehuatong
ohandkehuatong
الكلمات
التسجيلات
नाम तुझे घेता देवा होई समाधान

नाम तुझे घेता देवा होई समाधान

तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान

नाम तुझे घेता देवा होई समाधान

सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढ ज्ञान

कालगतीचे फिरविशी चक्र ते महान

मिळे मोक्ष तुझिया नामे देसी ऐसे दान

नाम तुझे घेता देवा होई समाधान

काम क्रोध माया भुलवी, मन धाव घेई

आशा निराशेचे फेरे जगी ठायीठायी

आहे तूच अंतर्ज्ञानी तुला सर्व जाण

नाम तुझे घेता देवा होई समाधान

बंधु माय बापा लागे आस दर्शनाची

दत्ता म्हणे ऐका नाथा हाक पामराची

अल्प बुद्धी माझी देवा आहे भक्त सान

नाम तुझे घेता देवा होई समाधान

नाम तुझे घेता देवा होई समाधान

तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान

नाम तुझे घेता देवा होई समाधान

नाम तुझे घेता देवा होई समाधान

المزيد من Prahlad Shinde

عرض الجميعlogo

قد يعجبك