logo

Galavar Khali

logo
الكلمات

गालावर खळी डोळ्यात धुंदी

ओठावर खुले लाली गुलाबाची

कधी कुठे कसा तुला सांग भेटू

वाट पाहतो मी एका इशारयाची

जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू

माझा रंग तू घे तुझा रंग मला दे

गालावर खळी डोळ्यात धुंदी

ओठावर खुले लाली गुलाबाची

कधी कुठे कसा तुला सांग भेटू

वाट पाहतो मी एका इशारयाची

जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू

माझा रंग तू घे तुझा रंग मला दे

I Love you

I Love you… I Love you … I Love you

Ho कोणता हा मौसम मस्त रंगाचा

तुझ्या सवे माझ्या जीवनी आला

सुने सुने होते किती मन माझे

आज तेच वाटे धुंद मधुशाला

जगण्याची मज आता कळते मजा

नाही मी कोणाचा आहे तुझा

जगण्याची मज आता कळते मजा

नाही मी कोणाचा आहे तुझा

सांगतो मी खरे खरे तुझ्या साठी जीव झुरे

मन माझे थरारे

कधी तुझ्या पुढे पुढे

कधी तुझ्या मागे मागे

करतो मी इशारे

जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू

अशी ये समोर तू माझा रंग तू घे

तुझा रंग मला दे

Hey तुझ्या पापण्यांच्या सावली खाली

मला जिंदगी घेउनी आली

तुझ्या चाहुलीची धुंदी आनंदी

अंतरास माझ्या छेडुनी गेली

जगण्याची मज आता येई नशा

तू माझे जीवन तू माझी दिशा

जगण्याची मज आता येई नशा

तू माझे जीवन तू माझी दिशा

आता तरी माझ्या वरी कर तुझी जादूगिरी

हुरहुर का जिवाला

बोल आता काही तरी भेट आता कुठे तरी

कसला हा अबोला

हे जाऊ नको दूर तू

जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू

माझा रंग तू घे तुझा रंग मला दे

Galavar Khali لـ Swapnil Bandodkar - الكلمات والمقاطع