ओढ तुझी छळते मला
भास असा का तुझा सारखा
आस तुझी लागे जीवा
भास असा का तुझा सारखा
झुलते का असे
भवती तुझ्या मन बावरे
दूर दूर का अशी तू राहते
ये ना ये तू जरा
रात सांगते
धुंद या क्षणात तू मोहुनी लाजते
पाहता मी तुला वेळ थांबते
झुलते का असे
भवती तुझ्या मन बावरे
ओढ तुझी छळते मला
भास असा का तुझा सारखा
आस तुझी लागे जीवा
भास असा का तुझा सारखा