menu-iconlogo
logo

Mazya Manala - Dostigiri (Marathi Lyrics)

logo
লিরিক্স
अल्लड फुलपाखराला आकाशी जाऊ दे

आकाशी जाऊ दे

खुसपुसणाऱ्या मनाला सरगम हि गाऊ दे

सरगम हि गाऊ दे

रंगात या तुझ्या स्वप्नांना न्हाऊ दे

आशेचा रंग हा चढताना पाहू दे

माझ्या मनाला तुझ्या प्रेमात या वाहू दे

तुझ्या नावाला जरा माझ्या नावात हि राहू दे

हा वारा कानात हळूच माझ्या

सांगतो कविता तुझी घुटमळताना

क्षण सारे जसे साखरेचे दाणे

तुझी गोळी लावती विरघळताना

सवई साऱ्या जुन्या वळणावर जाऊ दे

रस्ते हे प्रीतीचे जुळताना पाहू दे

माझ्या मनाला तुझ्या प्रेमात या वाहू दे

तुझ्या नावाला जरा माझ्या नावात हि राहू दे

हो.. ओ.. ओ... हो...

रंग हा चेहऱ्यावर माझ्या

तुझ्या प्रीतीचा अनोखा

आरसा भासतो हा मला

तुझ्या भेटीचा झरोखा

नात्याची काच हि स्पर्शुनी पाहू दे

भोळिशी आस हि डोळ्यांना लावू दे

हृदयाची आंच हि भडकूणी जाऊ दे

माझ्या मनाला तुझ्या प्रेमात या वाहू दे

तुझ्या नावाला जरा माझ्या नावात हि राहू दे...

माझ्या मनाला तुझ्या प्रेमात या वाहू दे

तुझ्या नावाला जरा माझ्या नावात हि राहू दे... रे...