menu-iconlogo
logo

Aabhas Ha

logo
লিরিক্স
कधी दूरदूर,कधी तू समोर,

मन हरवते आज का

का हे कसे, होते असे,ही आस लागे जीवा

कसा सावरू मी,आवरू ग मी स्वत:

दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा,आभास हा

छळतो तुला,छळतो मला !

आभास हा,आभास हा

कधी दूरदूर,कधी तू समोर,

मन हरवते आज का

का हे कसे, होते असे,ही आस लागे जीवा

कशी सावरू मी,आवरू रे मी स्वत:

दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा,आभास हा

छळतो तुला,छळतो मला!

आभास हा,आभास हा

क्षणात सारे उधाण वारे,

झुळुक होऊन जाती

कधी दूर तूही,कधी जवळ वाटे

पण,काहीच नाही हाती

मी अशीच हासते,उगीच लाजते,

पुन्हा तुला आठवते

मग मिटून डोळे तुला पाहते

तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा

दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा,आभास हा

छळतो तुला,छळतो मला !

आभास हा,आभास हा

मनात माझ्या हजार शंका,

तुला मी जाणू कशी रे

तू असाच आहेस,तसाच नाहीस,

आहेस खरा कसा रे

तू इथेच बस न,हळूच हस ना

अशीच हवी मला तू

पण माहीत नाही मला अजुनीहि

तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटे ही हवा

दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा,आभास हा

छळतो तुला,छळतो मला

आभास हा,आभास हा

कधी दूरदूर,कधी तू समोर,

मन हरवते आज का

का हे कसे,होते असे,ही आस लागे जीवा

कशी सावरू मी,आवरू रे मी स्वत:

दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा,आभास हा

छळतो तुला,छळतो मला

आभास हा,आभास हा