अभंग - संत चोखामेळा
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
अबीर गुलाल उधळीत रंग x 4
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग x 3
अबीर गुलाल उधळीत रंग
उंबरठ्यासी कैसे शिऊ आम्ही जातिहीन x 2
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन x 2
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग x2
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग x2
अबीर गुलाल उधळीत रंग
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू x 2
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ x2
विठ्ठलाचे नाम घेऊ x2
होऊनी निसंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
आषाढी कार्तिकी भक्तजन येती x 2
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती x2
चोख म्हणे नाम घेता x 2
भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग x2
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग x2
नाथा घरी नाचे माझा x3
सखा पांडुरंग