menu-iconlogo
logo

Firtya Chakavarti Desi (फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार)

logo
Liedtext
फिरत्या चाकावरती देसी

मातीला आकार

विठ्ठला तू वेडा कुंभार

विठ्ठला तू वेडा कुंभार

माती पाणी, उजेड वारा

तूच मिसळसी सर्व पसारा

माती पाणी, उजेड वारा

तूच मिसळसी सर्व पसारा

आभाळच मग ये आकारा

तुझ्या घटांच्या उतरंडीला

नसे अंत ना पार

तू वेडा कुंभार

विठ्ठला तू वेडा कुंभार

घटा घटांचे रुप आगळे

प्रत्येकाचे दैव वेगळे

घटा घटांचे रूप आगळे

प्रत्येकाचे दैव वेगळे

तुझ्याविणा ते कोणा न कळे

मुखी कुणाच्या पडते लोणी

कुणा मुखी अंगार

तू वेडा कुंभार

विठ्ठला तू वेडा कुंभार

तूच घडविसी, तूच फोडीसी

कुरवाळीसी तू तूच ताडीसी

तूच घडविसी, तूच फोडिसी

कुरवाळिसी तू तूच ताडीसी

न कळे यातून काय जोडीसी

देसी डोळे परी निर्मिसी

तयापुढे अंधार

तू वेडा कुंभार

विठ्ठला तू वेडा कुंभार

फिरत्या चाकावरती देसी

मातीला आकार

विठ्ठला तू वेडा कुंभार

विठ्ठला तू वेडा कुंभार