टक्क लावूनी तो बघतोया आईना
औंदा निराळा आलाया श्रावण महिना
पदर मला झालाया जड
सरला उतार आलाया चढ
फुल टोचती पायाला
वाट हि मोठी बाई अवघड
दिस जातोया रातच आता जाता जाईना
केस गुलाबी ओठाला छळे
कस रानाला गुपित कळे
काय बोललं फुलपाखरू
झालं शिवार मधाचे मळे
झूला देहाचा हवेत माझा राहता राहीना
घुटमळतो का पाय पायाशी
काळजात माझ्या होई धडधड
गाते कोकिळा गान कुणाच
कोण्या राजाचा आहे हा गड
टाप घोड्याची कानावरती येता येईना