गीत:- धरिला पंढरीचा चोर.
गायिका:- अनुराधा पौडवाल.
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*
धरिला.... ,
धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर,
गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांथोनिया दोर ओ ओ ओ,
धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर,
?
ह्रदय बंदीखाना केला, ह्रदय बंदीखाना केला,
आत विठ्ठल कोंडिला, आत विठ्ठल कोंडिला,
शक्ती केली दडादुडी, शक्ती केली दडादुडी,
विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी घातली बेडी,
धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर,
?
शब्दांचा मारा केला, शब्दांचा मारा केला,
विठ्ठल काकुळतीला आला, विठ्ठल काकुळतीला आला,
जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला,
जीवे न सोडी मी रे तुला, जीवे न सोडी मी रे तुला,
धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर,
गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर ओ ओ ओ,
धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर.
संत जनाबाई यांची अंभग रचना ?
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*