Hey, ढगानं आभाळ दाटलंया गं
उरात वादळ पेटलंया गं
ढगानं आभाळ दाटलंया गं
उरात वादळ पेटलंया गं
डोळ्यांन मनाला, मनानं डोळ्याला
गाठलंया गं, गाठलंया गं
थेंब-थेंब रुणूझुणू वाजते
वाऱ्याच्या पायात चाळ गं
ढगानं आभाळ दाटलंया गं
उरात वादळ पेटलंया गं
Hmm, अंगावरती गोड शहारा
काय मला हे झालंया
हो, ओठामधलं गुपित, राणी
गालावरती आलंया
अंगावरती गोड शहारा
काय मला हे झालंया
हो, ओठामधलं गुपित, राणी
गालावरती आलंया
काटे भवती असू दे
विणुया रेशमी माळ गं
ढगानं आभाळ दाटलंया गं
उरात वादळ पेटलंया गं
किती काळ हा जीव कोवळा
झुरलाया बघ राधेचा
खुलला, राणी, जणू दागिना
ओठावरती थेंब मधाचा
किती काळ हा जीव कोवळा
झुरलाया बघ राधेचा
ओ, खुलला, राणी, जणू दागिना
ओठावरती थेंब मधाचा
माती लोणी-लोणी झालीय
पावसाचं किती हे हाल गं
ढगानं आभाळ दाटलंया गं
उरात वादळ पेटलंया गं
डोळ्यांन मनाला, मनानं डोळ्याला
गाठलंया गं, गाठलंया गं
थेंब-थेंब रुणूझुणू वाजते
वाऱ्याच्या पायात चाळ गं
ढगानं आभाळ दाटलंया गं
उरात वादळ पेटलंया गं