menu-iconlogo
logo

Mala Ved Lagale Premache

logo
Lyrics
F) रंगबावऱ्या स्वप्नांना

सांगा रे सांगा...

कुंदकळ्यांना वेलींना

सांगा रे सांगा...

M) हे भास होती कसे

हे नाव ओठी कुणाचे

का सांग वेड्या मना

मला भान नाही जगाचे

मला वेड लागले प्रेमाचे

F) मला वेड लागले प्रेमाचे

M) प्रेमाचे... प्रेमाचे...

F) नादावले धुंदावले

कधी गुंतले मन बावरे

नकळे कधी कोणामुळे

सूर लागले मनमोकळे

M) हा भास की तुझी आहे नशा

मला साद घालती दाही दिशा

मला वेड लागले प्रेमाचे

मला वेड लागले प्रेमाचे

प्रेमाचे... प्रेमाचे...

F) जगणे नवे वाटे मला

कुणी भेटला माझा मला

खुलता कळी उमलून हा

मनमोगरा गंधाळला

M) हा भास की तुझी आहे नशा

मला साद घालती दाही दिशा

F) मला वेड लागले प्रेमाचे

M) मला वेड लागले प्रेमाचे

प्रेमाचे... प्रेमाचे...

Mala Ved Lagale Premache by Ketaki Mategaonkar/ Swapnil Bandodkar - Lyrics & Covers