गोडी मधाची चाखली
मिटले नयन, सरला उजेड
घेतली कवेत लाडकी
माझी सुगरण, माझी सुगरण
तिला सजवील, तिला भिजवील
रान फुलांची आरास दिलिया आंदन
सपान भुर्रर झालं, लाजून चुर्रर झालं
रातीचा दिसं केला, दिसात न्हाली रात
सपान भुर्रर झालं, लाजून चुर्रर झालं
रातीचा दिसं केला, दिसात न्हाली रात
भाळी कुकाच गोंदण
मिटलं व्हटान, फुलला मोहोर
घातली सजनानी साद ही
माझी सुगरण, माझी सुगरण
मला लाजवील, मला भिजवील
रान फुलांची आरास आलया चांदन
सपान भुर्रर झालं, लाजून चुर्रर झालं
रातीचा दिसं केला, दिसात न्हाली रात
सपान भुर्रर झालं, लाजून चुर्रर झालं
रातीचा दिसं केला, दिसात न्हाली रात
रूतलया अंग, झालीया दंग
फिरली नजर खुल्या रानात
आभाळानं छत हे धरलंया मिठीत
झाकलंया यौवन पाण्यात
दिलाया सबुत बांधीन खोपा
झाडाला झोका धीरा-धीरानं चढवीन
रूप नवाळ न्हाऊन
तुला आभाळी फिरवीन
तिला सजवील, तिला भिजवील
रान फुलांची आरास दिलिया आंदन
सपान भुर्रर झालं, लाजून चुर्रर झालं
रातीचा दिसं केला, दिसात न्हाली रात
सपान भुर्रर झालं, लाजून चुर्रर झालं
रातीचा दिसं केला, दिसात न्हाली रात
गोडी मधाची चाखली
मिटले नयन, सरला उजेड
घेतली कवेत लाडकी
माझी सुगरण, माझी सुगरण