-*-
(M) शब्दाविना ओठांतले
शब्दाविना ओठांतले
कळले मला कळले तुला
शब्दाविना कळले मला
ओठांतले कळले मला
(F) डोळ्यांतुनी हृदयातले
डोळ्यांतुनी हृदयातले
कळले मला कळले तुला
डोळ्यांतुनी कळले मला
हृदयातले कळले मला
-*-
(M) जुळले कधी धागे कसे
जडले तुझे मजला पिसे
(F) रात्रंदिनी ध्यानी-मनी
मूर्ति तुझी हसरी दिसे
(M) घडली कशी जादू अशी
घडली कशी जादू अशी
स्वप्नातला झुलतो झुला
(F) झुलतो झुला स्वप्नातला
स्वप्नातला झुलतो झुला
-*-
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर-
VijayRaje_ßђ๏รคɭє
-*-
(F) तू छेडिल्या तारांतुनी
जन्मांस या स्वर लाभले
(M) माझ्या-तुझ्या प्रीतीतुनी
गाणे नवे झंकारले
(F) गाणे नवे झंकारले
दाही दिशा भरुनी उरे
दाही दिशा भरुनी उरे
आनंद या जगण्यातला
(M) आनंद या जगण्यातला
कळले मला कळले तुला
शब्दाविना
(F) आ आ आ
(M) ओठांतले
(F) आ आ आ
(M) कळले मला कळले तुला
(F) शब्दाविना कळले मला
(M) ओठांतले कळले मला
-*-