गीत : एकटी एकटी
सौजन्य : सुशील जोगेकर
एकटी एकटी घाबरलीस ना~~¶
एकटी एकटी घाबरलीस ना
वाटलंच होत आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही
ना~ ना ना ना ना ना ना ना ना
ना~ ना ना ना ना ना ना ना ना
आली होती जाम झोप गुडूप झालो असतो
भीती बीती कसली थेट उद्याच उठलो असतो
====¶ संगीत ¶====
आली होती जाम झोप गुडूप झालो असतो
भीती बीती कसली थेट उद्याच उठलो असतो
मात्र वाटलं~~~¶
मात्र वाटलं आपल्यापुरता विचार बरा नाही
मी आहे शूर माझी आई तशी नाही
एकटी एकटी घाबरलीस ना
हा हा हा हा
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही
ना~ ना ना ना ना ना ना ना ना
ना~ ना ना ना ना ना ना ना ना
==¶ सौजन्य ¶==
==¶ सुशील जोगेकर ¶==
खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल
घाबरून जाईल अंधारात रडत बिडत बसेल
खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल
घाबरून जाईल अंधारात रडत बिडत बसेल
म्हणून आलो ~~~¶
म्हणून आलो आता काय घाबरायाचं नाही
कुशीत घेऊन झोप मला म्हणजे काळजी नाही
एकटी एकटी घाबरलीस ना
वाटलंच होत आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही
ना~ ना ना ना ना ना ना ना ना
हं~ हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं
====¶ संगीत ¶====
==¶ सौजन्य ¶==
==¶ सुशील जोगेकर ¶==
बर झालं आलास सोन्या काही खोटं नाही
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई
हं~ हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं
हं~ हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं
विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं
अंधार असतो फार मोठा, पिल्लू असतं~छोटं
विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं
अंधार असतो फार मोठा, पिल्लू असतं छोटं
नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन
कोवळी काच सोसेल कसे भविष्याचे घण
लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल
मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल
कोण असशील कुठे असशील करशील काय तेव्हा
लहान होऊन कुशीमध्ये शिरशील काय तेव्हा
माझा आहेस अजून ये रे माझ्यापाशी राहा
अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्न पहा
मोठी होतात मुलं~~~¶
मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही
मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई
हं~ हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं
हं~ हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं
हं~ हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं
==¶ सौजन्य ¶==
==¶ सुशील जोगेकर ¶==