menu-iconlogo
logo

sang na re mana

logo
Lyrics
अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे

अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे

आणि धुंदावती भाबडी लोचने

होतसे जीव का घाबरा सांगना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

श्वास गंधाळती

शब्द भांबावती

रोमरोमांतली कंपने बोलती

मोहरे मोहरे

पाकळी पाकळी,

भारलेल्या जीवा आवरावे किती

का अशा जागल्या

सांग संवेदना,

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

हे नवे भास अन्

ह्या नव्या चाहुली,

ऐकू ये कोठुनी साद ही मल्मली

गोठले श्वास अन्

स्पंदने थांबली,

हे शहारे जणू रेशमाच्या झुली

आज ओथंबल्या

का अशा भावना,

सांग ना रे मना

सांग ना रे मना

ओ सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

sang na re mana by Swapnil Bandodkar/Nihira Joshi - Lyrics & Covers