हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया
हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
गौरीसुता मोरया
होऽ हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया ऽ
हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
गौरीसुता मोरया
ओऽ हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दयाऽ
धावूनीया सुखी आनंद येई घरा
शांती घेई सदा या घरी आसरा
स्वर्ग हो ठेंगणा तोच होई घरा
संतोषाच्या गेही आले अमृत दाटूनिया
ओऽ हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
गौरीसुता मोरया
ओऽ हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया
चित्र हे देखणे ना विरावे कधी
रेशमी बंधने ना तुटावी कधी
तूच आम्हां पिता तूच करूणानिधी
छाया कृपेची लाभो सदा ही
सर्व जीवास या
होऽ हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
गौरीसुता मोरया
ओऽ हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया