काय मी चोर पण मी चोर कसा ते तरी सांग
सांग सखे मी चोर कसा
नटखट तू चितचोर असा
सांग सखे मी चोर कसा
नटखट तू चितचोर असा
ला ला ला ला ला
ही चोरी बळजोरी या प्रीतीच्या थापा रे
समजू नको उमजू नको खेळनसे हा सोपा रे
घालुन बेड्या नेतील वेड्या
घालुन बेड्या नेतील वेड्या
जन्मभरी तू कैदी जसा
सांग सखे मी चोर कसा
नटखट तू चितचोर असा
सांग सखे मी चोर कसा
नटखट तू चितचोर असा
बेहोशी मदहोशी हिरव्याहिरव्या किमयेची
यौवन हे मधुवन हे पर्वा मज ना दुनियेची
या एकांती वनी दिनांती
या एकांती वनी दिनांती
प्रणयासाठी जीव पिसा
सांग सखे मी चोर कसा
नटखट तू चितचोर असा
सांग सखे मी चोर कसा
नटखट तू चितचोर असा
रंगत ही संगत ही या कैदेची और मजा
हात धरू साथ करू दोघे भोगू एक सजा
या भेटीचा दिठीमिठीचा
या भेटीचा दिठीमिठीचा
हृदयांवरती गोड ठसा
सांग सखे मी चोर कसा
नटखट तू चितचोर असा