पहिली वहिली नजरा नजर
पहिल्या पिरतीचा पहिला बहर
पहिली वहिली नजरा नजर
पहिल्या पिरतीचा पहिला बहर
चांदवा माळुनी नभ दरवळलं
साजनी उन्हाच्या दुपारी गं
Feeling लय भारी, लय भारी गं
Feeling लय भारी, लय भारी गं
दिस पुरंना, रात पुरंना, सरंना जीवाचं गाणं
भारून गेलं तुझ्या रूपानं झालंया पुरं दिवानं
तुझ्या वार्याने सळसळतीया उरात हिरवी पानं
का तुला पाहुनी मध झरझरलं
साजनी मनाच्या कपारी गं?
Feeling लय भारी, लय भारी गं
Feeling लय भारी, लय भारी गं
वाऱ्यावं मुकं, ढगाला झोकं लागीर भन्नाट झालं
गालावं आली व्हटाची लाली, सपान रंगून गेलं
काळीज खूळ, तळमळतया बांधून बाशिंग आलं
पापण्या झाकुनी क्षण लखलखलं
साजनी सुखाच्या किनारी गं
Feeling लय भारी, लय भारी गं
Feeling लय भारी, लय भारी ग