गणपती गणाधीशा वक्रतुंड मोरया
एकदंत, दयावंत तुच बाप्पा मोरया
गणपती गणाधीशा वक्रतुंड मोरया
एकदंत, दयावंत तुच बाप्पा मोरया
तुझ्या रूपाची लागलिया गोडी
तुझ्या चरणाची लाभू दे समाधी
प ध नी सा, प नी ध नी
प ध प म ग म सा
प ध नी सा, प नी ध नी
प ध प म ग म सा
गणपती गणाधीशा वक्रतुंड मोरया
एकदंत, दयावंत तुच बाप्पा मोरया
देवांचा देव तू माझा गणराया
स्मरते तुला मी, हे गौरीहरा
त्रैलोक्याचा तू भाग्यविधाता
संकट तारीसी तू माझ्या राया
सदैव राहो कृपादृष्टी तुझी
तू निराकार ओंकारा
(गणराया, गणराया, ओंकारा)
(गणराया, गणराया, ओंकारा)
(गणराया, गणराया, ओंकारा)
(गणराया, गणराया, ओंकारा)
छुनछुन पायी वाजते घुंगरू माझ्या बाप्पाचे
हिरे जडीत मुकूट शोभते डोई माझ्या मोरयाचे
पिवळा पिताबंर...
पिवळा पिताबंर शेला भरजरी
नाचत आली गणाची स्वारी
छुनछुन पायी वाजते घुंगरू माझ्या बाप्पाचे
सजले धरती आणि अंबर आगमनाला बाप्पाचे
ताल-सुरांची रंगली मैफिल
ताल-सुरांची रंगली मैफिल
हर्ष फुलांची झाली उधळण स्वागताला मोरयाचे
छुनछुन पायी वाजते घुंगरू माझ्या बाप्पाचे
छुनछुन पायी वाजते घुंगरू माझ्या बाप्पाचे
घुंगरू माझ्या बाप्पाचे, घुंगरू माझ्या बाप्पाचे