menu-iconlogo
huatong
huatong
Letras
Grabaciones
उरामंदी माया त्याच्या

काळ्या मेघावानी

दाखविना कधी कुना

डोळ्यातलं पाणी

झिजू झिजू संसाराचा

गाडा हाकला

व्हटामंदी हासू जरी

कना वाकला

घडीभर तू थांब जरा

ऐक त्याची धाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं

उमगाया बाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं

उमगाया बाप रं

मुकी मुकी माया त्याची

मुकी घालमेल

लेकराच्या पायी उभा

जल्म उधळंल

आधाराचा वड जणू

वाकलं आभाळ

तेच्याइना पाचोळा

जीनं रानोमाळ

जीनं रानोमाळ

घडीभर तू थांब जरा

ऐक त्याची धाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं

उमगाया बाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं

उमगाया बाप रं

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -

किती जरी लावलं तू

आभाळाला हात

चिंता तुझी मुक्कामाला

तेच्या काळजात

वाच तेच्या डोळ्यातली

कधी कासाविशी

तुझ्या पायी राबनं बी

हाये त्याची खुशी रं

हाये त्याची खुशी

घडीभर तू थांब जरा

ऐक त्याची धाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं

उमगाया बाप रं

लई अवघड हाय गड्या

उमगाया बाप रं

उमगाया बाप रं

Más De Ajay Gogavale/Vijay Narayan Gavande

Ver todologo