गीतरचना:- महाकवी वामनदादा कर्डक
सौजन्य:- अजय वीर
कानात काल माझ्या
माझे मरण म्हणाले
कानात काल माझ्या
माझे मरण म्हणाले
तन मन तुलाच माझे
आले शरण म्हणाले
कानात काल माझ्या
माझे मरण म्हणाले
***संगीत***
कोटी उपास पोटी
धरलेस तूच पोटी
कोटी उपास पोटी
धरलेस तूच पोटी
झाले तुझ्या कुळाचे
शुद्धीकरण म्हणाले
झाले तुझ्या कुळाचे
शुद्धीकरण म्हणाले
कानात काल माझ्या
माझे मरण म्हणाले
***संगीत***
जळले दिव्याप्रमाणे
नाही तुझे फुकाचे
जळले दिव्याप्रमाणे
नाही तुझे फुकाचे
गौतम तुझ्यात आहे
मज त्रिशरण म्हणाले
गौतम तुझ्यात आहे
मज त्रिशरण म्हणाले
कानात काल माझ्या
माझे मरण म्हणाले
***संगीत***
ओटीत गौतमाच्या
घालून सात कोटी
ओटीत गौतमाच्या
घालून सात कोटी
चल झोप शांत आता
माझे सरण म्हणाले
चल झोप शांत आता
माझे सरण म्हणाले
कानात काल माझ्या
माझे मरण म्हणाले
***संगीत***
वामन समान माझ्या
चिमण्या चिला पिलांनो
वामन समान माझ्या
चिमण्या चिला पिलांनो
तारील मी तुम्हाला
एकीकरण म्हणाले
तारील मी तुम्हाला
एकीकरण म्हणाले
तन मन तुलाच माझे
आले शरण म्हणाले
कानात काल माझ्या
माझे मरण म्हणाले
*****
सौजन्य:- अजय वीर
***जय भीम, नमो बुद्धाय***