लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात-2
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात-2
$
लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात-2
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात-2
**सौजन्य: अजय वीर**
गुर ओढणारा पोरगा माझा साहेब झाला-2
तहसिलीतला मोठा आता नायब झाला-2
त्याचा दरारा असे सरकारी नौकरात-2
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात-2
राजवाड्यातला माणूस आता गावात आला-2
सा-या गावचा कारभारी आमुचा येडुबा झाला-2
झाला सरपंच बोलाया लागला जोरात-2
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात-2
एका विहीरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया-2
तीथ समतेच मंदिर आता लागल्या बांधाया-2
नात जुळू लागल खालच्या वरच्या थरात-2
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात-2
गाव पंगतीत आता बसू लागला प्रकाश-2
परीवर्तनातला तो दिसू लागला विकास-2
भर चौकात आता नीघाया लागली वरात-2
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात-2
लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात-2
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात-3
**सौजन्य: अजय वीर**