#Ashi Hi Banwa Banwi #Anuradha #Sudesh #Shailendra
*****Prelude*****
(F) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
(F) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
(M) प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे...
(M) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
(C) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
(M) मोहुनिया ऐसी जाऊ नको,
(F) रोखुनिया मजला पाहू नको
(M) मोहुनिया ऐसी जाऊ नको,
(F) रोखुनिया मजला पाहू नको
(M) गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे...
(M) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
(F) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
(M) प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे...
(F) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
(C) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
*****Interlude 1*****
(M) पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय...
(F) अवघी अवनी सजली धुंद मोहरली..
(M) पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय...
(F) अवघी अवनी सजली धुंद मोहरली..
(M) उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे,
(F) सौख्यात प्रेम-बंधांच्या हे अंतरंग न्हावे...
(M) हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे...
(C) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
(C) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
*****Interlude 2*****
(M) मदभारा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती हाय हाय ...
(F) रंग तू सोड रे छंद हा मजसाठी...
(M) मदभारा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती हाय हाय ...
(F) रंग तू सोड रे छंद हा मजसाठी...
(M) हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा..
(F) हे तीर ,चार नयनांचे देती आम्हा दिलासा...
(M) जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे ..
(F) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
(M) हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
(M) प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे
(F)हृदयी वसंत फुलताना (M) प्रेमास रंग यावे
(F)हृदयी वसंत फुलताना (M) प्रेमास रंग यावे
*****End*****