तो-माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला घावलं
ती-माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला घावलं
तो-माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला घावलं..
एक वर्सान आपलं दर्शन गणानं गौरीला दावलं हा
ती-एक वर्सान आपलं दर्शन गणानं गौरीला दावलं
(गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा)
तो-गणा माझा होता तांडवात दंग
ती-गणा माझा होता तांडवात दंग
तो-नाही गौरीनही केला त्याचा नाद भंग
ती-नाही गौरीनही केला त्याचा नाद भंग
तो-छुमछुम छनछन छुमछुम छनछन
चढत असा हा रंग
वाऱ्यासंग वाजं टाळमृदंग.
ती-हेहेहेहे वार्यासंग वाजं टाळमृदंग
तो-एकटक ध्यान तिनं त्याच्यावर लावलं.
ती-एकटक ध्यान तिनं त्याच्यावर लावलं.
तो-मन गौरीचं त्या माऊलीचं अहो हरकावलं
माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला घावलं
ती-माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला घावलं
ट्रॅक सौजन्य-गणेश धोटे पाटील
तो-गणराज राही बा सर्व ठायी
ती-गणराज राही बा सर्व ठायी
तो-येई वरसानं अवनित ती गौरीमाई.
ती-येई वरसानं अवनित ती मौरीमाई.
तो-डोळं भरुनी निरखून पाही पाऊली घुंगरू नाही
पद शोभाया त्याचं ती त्याला देई
ती-होहोहो.पद शोभाया त्याचं ती त्याला देई
तो-गणाला नटवून माऊली ती जाई.
ती-गणाला नटवून माऊली ती जाई.
तो-धुंद नाचानं असं जोरानं दूर भिरकावलं
माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला घावलं
ती-माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला घावलं
तो-माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला घावलं...
एक वर्सान आपलं दर्शन गणानं गौरीला दावलं
ती-एक वर्सानं आपलं दर्शन
गणानं गौरीला दावलंऽऽ.... हाबं
तो-माझ्या गणा तू रं गजानना तू रं
तुला गार्हाणं घालितो माझं
माझ्या गणा तू रं नवसाला पाव रं आज...
माझ्या गणा तू रं नवसाला पाव रं आज
माझ्या गणा तू रं नवसाला पाव रं आज..
ती-माझा गणपती गणपती गणपती
करू त्याची आरती आरती आरती
तो-माझ्या गणा तू रं गजानना तू रं
तुला गार्हाणं घालितो माझं
माझ्या गणा तू रं नवसाला पाव रं आज
माझ्या गणा तू रं गजानना तू रं
तुला गार्हाणं घालितो माझं
माझ्या गणा तू रं नवसाला पाव रं आज