menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Ha Chandra Tujhyasathi

Swapnil Bandodkarhuatong
bubbababe1huatong
Letras
Grabaciones
हा चंद्र तुझ्यासाठी,

ही रात तुझ्यासाठी,

आरास ही ताऱ्यांचीss

गगनात तुझ्यासाठी,

हा चंद्र तुझ्यासाठी,

ही रात तुझ्यासाठी,

आरास ही ताऱ्यांचीss

गगनात तुझ्यासाठी,

कैपाक अशावेळी,

मज याद तुझी आली......

ये नाss

मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू,

थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू,

अनुरागी रसरंगी होऊन ये तू,

नाजुकशी एक परी होऊन ये तू …

वर्षाव तुझ्या तारुण्याचा,

रिमझिमता माझ्यावरी होऊ दे....

रेशीम तुझ्या लावण्याचे,

चंदेरी माझ्यावरी लहरू दे....

नाव तुझे माझ्या ओठावर येते,

फूल जसे कि फूलताना दरवळते..

इतके मज कळते, अधुरामी येते,

चांदरात ही बघ नीसटून जाते....

बांधिन गगनास झुला,

जर देशील साथ मला.....

ये नाss

मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू,

थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू,

अनुरागी रसरंगी होऊन ये तू,

नाजुकशी एक परी होऊन ये तू …

हे क्षण हळवे एकांताचे,

दाटलेले माझ्या किती भोवताली,

चाहुल तुझी घेण्यासाठी,

रात्र झाली आहे मऊ मखमाली.

आज तुला सारे काही सांगावे,

बिलगुनिया तु मजला ते ऐकावे,

होऊन कारंजे उसळे मन माझे,

पाऊल का अजुनही ना तुझे वाजे.

जीव माझा व्याकुळला,

दे आता हाक मला.

ये नाss

मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तु,

थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तु,

अनुरागी रसरंगी होऊन ये तु,

नाजुकशी एक परी होऊन ये तु.

Más De Swapnil Bandodkar

Ver todologo