menu-iconlogo
logo

Ashi Chikmotyachi Maal

logo
Letras
अशी चिक मोत्याची माळ

होती ग तीस तोळ्याची ग

चिक मोत्यांची माळ

होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा ग

गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा ग धृ

ह्या चिक माळेला रेशमी

मऊशार दोरा ग

ह्या चिक माळेला रेशमी

मऊशार दोरा ग

मऊ रेशमांच्या दोऱ्यात

नवरंगी माळ ओवीली ग

रेशमांच्या दोऱ्यात

नवरंगी माळ ओवीली ग १

Chorus

अशी चिक मोत्याची माळ

होती ग तीस तोळ्याची ग

चिक मोत्याची माळ

होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा ग

गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा ग

ह्या चिक माळेला

हिऱ्यांचे आठ आठ पदर ग

ह्या चिक माळेला

हिऱ्यांचे आठ आठ पदर ग

अशी तीस तोळ्याची माळ

गणपतीला घातली ग..

तीस तोळ्याची माळ

गणपतीला घातली ग २

Chorus

अशी चिक मोत्याची माळ

होती ग तीस तोळ्याची ग

चिक मोत्याची माळ

होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा ग

गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा ग

मोऱ्या गणपतीला फुलून

माळ शोभली ग

मोऱ्या गणपतीला फुलून

माळ शोभली ग

अशी चिक माळ पाहुनी

गणपती किती हासला ग..

चिक माळ पाहुनी

गणपती किती हासला ग ३

Chorus

अशी चिक मोत्याची माळ

होती ग तीस तोळ्याची ग

चिक मोत्याची माळ

होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा ग..

गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा ग

त्याने गोड हासुनी मोठा

आशीर्वाद दिला ग

त्याने गोड हासुनी मोठा

आशीर्वाद दिला ग

चला चला करूया नमन

गणरायाला ग

त्याच्या आशीर्वादाने

करू सुरुवात

शुभ कार्याला ग

Chorus

अशी चिक मोत्याची माळ

होती ग तीस तोळ्याची ग

चिक मोत्याची माळ

होती ग तीस तोळ्याची ग

जसा गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा ग

गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा ग…

गणपती बाप्पा मोरया !