menu-iconlogo
logo

Sajan Dari Ubha

logo
Paroles
पिया बिन तरसत रहू दिन रैना

पिया बिन तरसत रहू दिन रैना

पिया बिन तरसत रहू दिन रैना

पिया बिन तरसत रहू दिन रैना दिन रैना

सजन बिन जिया बैचेन बरसत मोरे नैन

पिया बिन तरसत रहू दिन रैना

सजण दारी उभा काय आता करू

सजण दारी उभा काय आता करू

घर कधी आवरू मज कधी सावरू

सजण दारी उभा

मी न केली सखे अजुन वेणीफणी

मी न केली सखे अजुन वेणीफणी

मी न पुरते मला निरखिले दर्पणी

अन् सडाही न मी टाकिला अंगणी

राहिले नाहणे राहिले नाहणे कुठुन काजळ भरू

घर कधी आवरू मज कधी सावरू

सजण दारी उभा

मी न दुबळी कुडी अजुन शृंगारली

मी न सगळीच ही आसवे माळिली

मी न दुबळी कुडी अजुन शृंगारली

मी न सगळीच ही आसवे माळिली

प्राणपूजा न मी अजुनही बांधिली

काय दारातुनी काय दारातुनी परत मागे फिरू

घर कधी आवरू मज कधी सावरू

सजण दारी उभा

बघ पुन्हा वाजली थाप दारावरी

बघ पुन्हा वाजली थाप दारावरी

हीच मी ऐकिली जन्मजन्मांतरी

तीच मी राधिका तोच हा श्रीहरी

हृदय माझे कसे हृदय माझे कसे मीच हृदयी धरू

घर कधी आवरू मज कधी सावरू

सजण दारी उभा

Sajan Dari Ubha par Aarya Ambekar - Paroles et Couvertures