करून अर्पण, तुला समर्पण
घरात घरपण मी आज पाहिले, मी पाहिले
ऋणानुबंधात, गीत गंधात
मी आनंदात आज गायिले, मी गायिले
दिसं वाटे वेगळा अन लागे का लळा?
हे वेडे मन माझे पुरतेच भाळले
सुख कळले-कळले, सुख कळले-कळले
कळले ना कसे असे सूर जुळले
सुख कळले-कळले, सुख कळले-कळले
कळले ना कसे असे सूर जुळले, मन जुळले
अंतरंगाने, देहअंगाने स्पर्श केला
अन वाटे स्वर्गचं आला हाताला
स्वप्न जे होते, पूर्ण ते झाले
मुक्त जे होते आता बंधन आले नात्याला
वचनांचे अर्थ मी, बंधन हे सार्थ मी
अर्धांगी समजूनी संपूर्ण पाळले
सुख कळले-कळले, सुख कळले-कळले
कळले ना कसे असे सूर जुळले
सुख कळले-कळले, सुख कळले-कळले
कळले ना कसे असे सूर जुळले, मन जुळले
ओ, प्रार्थना होती सात जन्मांची
भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावी माथ्याला
पूर्तता झाली सोनपायाने
आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला
जन्मांचे बंध हे, प्रीतीचे गंध हे
तू एका गजरयाने केसात माळले
सुख कळले-कळले, सुख कळले-कळले
कळले ना कसे असे सूर जुळले
सूर जुळले, मन जुळले