menu-iconlogo
logo

Aai Bhavani Tujhya Krupene

logo
Paroles
कुटुंब स्वरोस्तुते प्रस्तुत

नवरात्रौत्सव विशेष गोंधळ

(पु १)

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला

अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला

अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला

(पु २)

आई कृपा करी, माझ्यावरी,

जागवितो रात सारी

आई कृपा करी, माझ्यावरी,

जागवितो रात सारी

आज गोंधळाला येss....

(पु १,२)

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये

(कोरस)

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला गं अंबे गोंधळाला ये

(पु १) अंबाबाईचाsss

(कोरस) उधं उधं उधं उधं उधं

(कोरस) उधं उधं उधं उधं उधं

(पु ३)

गळ्यात घालून कवड्याची माळ

पायात बांधिली चाळ

हातात परडी तुला ग आवडी

वाजवितो संभळ

धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता

भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता

(पु ४)

आई कृपा करी, माझ्यावरी,

जागवितो रात सारी

आई कृपा करी, माझ्यावरी,

जागवितो रात सारी

आज गोंधळाला येSS ....

(पु ३,४)

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये

(कोरस)

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला गं अंबे गोंधळाला ये

(पु ३) अंबाबाईचाsss

(कोरस) उधं उधं उधं उधं उधं

उधं उधं उधं उधं उधं

(पु ५)

अग सौख्यभरीला माणिक मोती

मंडप आकाशाचा

हात जोडुनि करुणा भाकितो

उद्धार कर नावाचा

अधर्म निर्दाळुनी धर्म हा

आई तूच रक्षिला

महिषासुरमर्दिनी पुन्हा हा

दैत्य इथे मातला

(पु १) आज आम्हावरी संकट भारी

धावत ये लौकरी

(पु ३) आज आम्हावरी संकट भारी

धावत ये लौकरी

अंबे गोंधळाला ये SSSSssss'

(पु २,४)

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये

(कोरस)

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये

(पु ६)

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा

गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा

(कोरस) भवानीचाsss

(पु ६)

हेs लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा

गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा

(कोरस) भवानीचाsss

(पु ६) मी पणाचा दिमाख तुटला

अंतरंगी आवाज उठला

ऐरणीचा सवाल सुटला

या कहाणीचाss

(पु १)

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा

गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा

(कोरस) भवानीचाsss

(पु २)

हेs लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा

गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा

(पु १) इज तळपली, आग उसळली

ज्योत झळकली, आई गं…

(कोरस) या दिठीची काजळ काळी

रात सरली आई गं…

(पु २) बंध विणला, भेद शिनला

भाव भिनला आई गं…

(कोरस) भर दुखांची आस जीवाला

रोज छळते आई गं…

(पु ४) माळ कवड्यांची घातली गं..

आग डोळ्यात दाटली गं..

कुंकवाचा भरून मळवट

या कपाळीला…

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा

गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा

(कोरस) भवानीचाsss

(पु ३)

हेs लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा

गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा

(पु ३) आई राजा उधं उधं उधं..

(कोरस) उधं..उधं..उधं..उधं.

(पु ४) तुळजापूर तुळजाभवानी आईचा

(कोरस) उधं..उधं..

(पु ५) माहुरी गडी रेणुका देवीचा

(कोरस) उधं..उधं..

(पु ६) आई अंबाबाईचा

(कोरस) उधं..उधं..

(पु ५) देवी सप्तशृंगीचा

(कोरस) उधं..उधं..

(पु ३) बा सकलकला अधिपती गणपती धाव

(कोरस) गोंधळाला याव

(पु २) पंढरपूर वासिनी विठाई धाव

(कोरस) गोंधळाला यावं

(पु १)

गाज भजनाची येऊ दे गं

झांज सुजनाची वाजु दे

पत्थरातून फुटलं टाहो

या प्रपाताचा

Aai Bhavani Tujhya Krupene par Ajay Gogavale - Paroles et Couvertures