पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाची साकार विठ्ठल
हरीनामे झंकार विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
तू बाप तूच बंधू
तू सखा रे तुच त्राता रे
भूतली या पाठीराखा
तूच आता
अंधार यातनेचा
भोवती हा दाटलेला रे
संकटी या धावूनी ये
तूच आता
होऊन सावली हाकेस धावली
तुजवीण माऊली जगू कैसे
चुकलो जरी कधी तू वाट दावली
तुजवीण माऊली जगू कैसे
करकटावरी ठेवोनी
ठाकले विटेवर काय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
साजिरे स्वरूप सुंदर
तानभूक हारपून जाय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
ना उरली भवभयचिंता
रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
तू कळस तूच रे पाया
मज इतुके उमजुन जाता
राऊळात या देहाच्या मी तुलाच मिरविन आता
लोचनात त्रिभूवन आवघे
लेकरांस गवसुन जाय
माझी पंढरीची माय ,माझी पंढरीची माय