menu-iconlogo
logo

Lagira Zal - Male Version

logo
Paroles
लागीरं-लागीरं झालं, लागीरं झालं रं

लागीरं-लागीरं झालं, लागीरं झालं रं

(लागीरं-लागीरं झालं रं, लागीरं झालं रं)

(भिरभिर मन भिरभिर रं, लागीरं झालं रं)

हो, झपाटलं पिरतीनं जीव न्हाई थाऱ्याला

(हो, लागीरं-लागीरं झालं रं, लागीरं झालं रं)

हो, झपाटलं पिरतीनं जीव न्हाई थाऱ्याला

लपेटून घेतलं पतंगान दोऱ्याला

नजरेनं गेला तडा, लागला जिव्हारी खडा

नजरेनं गेला तडा, लागला जिव्हारी खडा

उतू-उतू गेलं जिणं...

उतू-उतू गेलं जिणं, येई ना किनाऱ्याला

झपाटलं पिरतीनं जीव न्हाई थाऱ्याला

(लागीरं-लागीरं झालं रं, लागीरं झालं रं)

(भिरभिर मन भिरभिर रं, लागीरं झालं रं)

जिथं-तिथं तुझा भास होतो मला

पहिल्या-वहिल्या पिरतीचा हा नाद खुळा

जिथं-तिथं तुझा भास होतो मला

पहिल्या-वहिल्या पिरतीचा हा नाद खुळा

आरपार गेला तीर, जगाची न्हाई फिकीर

तुझं झालं माझं मन...

तुझं झालं माझं मन कळलं शिवाराला

झपाटलं पिरतीनं जीव न्हाई थाऱ्याला

(लागीरं-लागीरं झालं रं, लागीरं झालं रं) लागीरं झालं रं

(भिरभिर मन भिरभिर रं, लागीरं झालं रं) लागीरं झालं रं

हो, दिस ग्वाड लागत न्हाई तुझ्याईणा

सांज माझी ढळत न्हाई तुझ्याईणा

दिस ग्वाड लागत न्हाई तुझ्याईणा

सांज माझी ढळत न्हाई तुझ्याईणा

रात वाटं वैऱ्यावाणी, किर्रर्र झाली जिंदगानी

पिसावांनी झालं मन...

पिसावांनी झालं मन, बिलगलं वाऱ्याला

झपाटलं पिरतीनं जीव न्हाई थाऱ्याला

(लागीरं-लागीरं झालं रं, लागीरं झालं रं) लागीरं झालं रं

(भिरभिर मन भिरभिर रं, लागीरं झालं रं)

(लागीरं-लागीरं झालं रं, लागीरं झालं रं)

(लागीरं-लागीरं झालं, लागीरं झालं)

(लागीरं-लागीरं, लागीरं)