जीव झाला येडापीसा रात-रात जागलो
पुरं दिसभर तूझ्या फिरतो मागंमागनं
जीव झाला येडापीसा रात-रात जागलो
पुरं दिसभर तूझ्या फिरतो मागंमागनं
जादु मंतरली कुनी, सपनात जागापनी
नशीबी भोग असा डावला
तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
माग पळुन-पळुन वाट माझी लागली
अन तू वळुन बी माझ्याकडं पाह्यना
हे, भीरभीर मनाला या घालु कसा बांध गं
अवसची रात मी अन पुनवचा तु चांद गं
नजरतं मावतीया तरी दूर धावतीया
मनीचा ठाव तूला मीळना
हाता तोंडा म्होरं घास परी गीळना
गेला जळुन-जळुन जीवं प्रीत जुळना
सारी इस्कटून ज़िंदगी मी पाहिली
तरी झाली कुटं चूक मला कळना?
सांदी कोपऱ्यात उभा येकला कधीचा
लाज ना कशाची तकरार न्हाई
भास वाटतोया ह्ये खरं का सपानं
सुखाच्या या सपनाला दार न्हाई
हे, राखं झाली जगन्याची हाय तरी जीता
भोळं प्रेम माझं अन भाबडी कथा
बग जगतूय कसं, साऱ्या जन्माच हासं
जीव चिमटीत असा घावला
तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
माग पळुन-पळुन वाट माझी लागली
अन तू वळुन बी माझ्याकडं पाह्यना