menu-iconlogo
logo

Dev Jaanive Jaanila

logo
Paroles
देव जाणिवे जाणिला

देव जाणिवे जाणिला

आता विठ्ठल पाहिला

काया जाहली पंढरी

ज्ञान जागले अंतरी

देव जाणिवे जाणिला

देव जाणिवे जाणिला

पाय करती करती रोज सत्कर्माची वारी

डोई धरली तुळस ऐसी सद्गुणांची न्यारी

पाय करती करती रोज सत्कर्माची वारी

डोई धरली तुळस ऐसी सद्गुणांची न्यारी

दोष चैतन्ये सांडीला दोष चैतन्ये सांडीला

आता विठ्ठल पाहिला

देव जाणिवे जाणिला

देव जाणिवे जाणिला

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

जन्मदाता बा विठ्ठल जन्मदायिनी रखुमाई

लोटांगणी अहंकार सांडे चरणाच्या ठायी

सेवाभावी हरमुखी हरी भेटला सावळा

संतसंगे हे जीवन झाले कान्हाई कान्हाई

दिस दिस एकादशी मास आषाढ महिना

तुझ्या ध्यानात या मनी माझ्या आनंद माईना

मोह सुटला ग सारा अनुभवे आवडीने

सुटे संसाराची आस तुझा ध्यास तो जाईना

दाहीदीशा तुझे रूप झालो धन्य बा विठ्ठला

दिव्यदर्शन सोहळा अनुपम्य हा विठ्ठल

चराचरात या देवा तुझे देहू नी आळंदी

तुझ्या लेकरांची सेवा यात पुण्याची गा संधी

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

देव जाणिवे जाणिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आ आ आ