रुणझुण वाजंत्री वाजती
वाजंत्री वाजती
म्होरं कलावंती नाचती कलावंती नाचती
रुणझुण वाजंत्री वाजती
म्होरं कलावंती नाचती कलावंती नाचती
नवरा आला वेशीपाशी
नवरा आला वेशीपाशी
नवर्या नवरी कशी नेशी
नवर्या नवरी कशी नेशी
देईन येसकर्याचा मान
नवरी जिंकून नेईन जिंकून नेईन
देईन येसकर्याचा मान
नवरी जिंकून नेईन जिंकून नेईन
नवरा आला देवळापाशी
नवरा आला देवळापाशी
नवर्या नवरी कशी नेशी
नवर्या नवरी कशी नेशी
विडा देवाजी देईन
नवरी जिंकून नेईन जिंकून नेईन
विडा देवाजी देईन
नवरी जिंकून नेईन जिंकून नेईन
नवरा आला मांडवापाशी
नवरा आला मांडवापाशी
नवर्या नवरी कशी नेशी
नवर्या नवरी कशी नेशी
मांडव खंडणी देईन
नवरी जिंकून नेईन जिंकून नेईन
मांडव खंडणी देईन
नवरी जिंकून नेईन जिंकून नेईन
नवरा आला भोवल्यापाशी
नवरा आला भोवल्यापाशी
नवर्या नवरी कशी नेशी
नवर्या नवरी कशी नेशी
खण करवलीला देईन
नवरी जिंकून नेईन जिंकून नेईन
खण करवलीला देईन
नवरी जिंकून नेईन जिंकून नेईन
तिळातांदळा भरली मोट
तिळातांदळा भरली मोट
ज्याची होती त्याने नेली
वेडी माया वाया गेली
रुणझुण वाजंत्री वाजती
म्होरं कलावंती नाचती कलावंती नाचती
रुणझुण वाजंत्री वाजती
म्होरं कलावंती नाचती कलावंती नाचती