menu-iconlogo
logo

Geet Ramayan Swayamvar Jhale Siteche

logo
Paroles

Geet Ramayan

गीत ग. दि. माडगूळकर

संगीत सुधीर फडके

आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें

स्वयंवर झालें सीतेचे 7

श्रीरामांनी सहज उचलिलें धनू शंकराचें

पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे

श्रीरामांनी सहज उचलिलें धनू शंकराचें

पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे

उभे ठाकलें भाग्य सांवळें

समोर दुहितेचें 2

स्वयंवर झालें सीतेचे 4

मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी

नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी

मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी

नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी

फुलुं लागलें फूल हळुं

हळू गालीं लज्जेचें 2

स्वयंवर झालें सीतेचे 4

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही

तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही

तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई

श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे 2

स्वयंवर झालें सीतेचे 4

झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला

गगनामाजीं देव करांनी करिती करताला

झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला

गगनामाजीं देव करांनी करिती करताला

त्यांच्या कानीं गजर

पोंचले मंगल वाद्यांचे 2

स्वयंवर झालें सीतेचे 4

अंश विष्णुचा राम sss

अंश विष्णुचा राम, धरेची

दुहिता ती सीता 2

गंधर्वांचे सूर लागले जयगीता गातां 2

आकाशाशीं जडलें नातें ऐसे धरणीचें 2

स्वयंवर झालें सीतेचे 4