menu-iconlogo
huatong
huatong
Paroles
Enregistrements
अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे

अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे

आणि धुंदावती भाबडी लोचने

होतसे जीव का घाबरा सांग ना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

श्वास गंधाळती

शब्द भांबावती

रोमरोमांतली कंपने बोलती

मोहरे-मोहरे पाकळी-पाकळी

भारलेल्या जीवा आवरावे किती

का अशा जागल्या सांग संवेदना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

हे नवे भास अन्

ह्या नव्या चाहुली

ऐकू ये कोठुनी साद ही मलमली

गोठले श्वास अन् स्पंदने थांबली

हे शहारे जणू रेशमाच्या झुली

आज ओथंबल्या का अश्या भावना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

सांग ना रे मना

Davantage de Swapnil Bandodkar/Nihira Joshi Deshpande

Voir toutlogo