रंगात रंगतो श्यामरंग
पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून ताण विसरून भान हि वाट कुणाची बघते
रंगात रंगतो श्यामरंग
पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून ताण विसरून भान हि वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या
लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा हि बावरी हरीची...राधा हि बावरी
राधा हि बावरी हरीची...राधा हि बावरी
हिरव्या हिरव्या झाडांची...
पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरूनि, शावार्धारा जरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून जाई
हा उनाड वार गोज प्रीतीचे गाणे सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या
लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा हि बावरी हरीची....राधा हि बावरी
राधा हि बावरी हरीची....राधा हि बावरी
आज इथे या तरु तळी, सूर वेनुचे खुणावती
तुज सामोरी जाताना, उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे कि सत्य
म्हणावे राधा हरपून जाई
हा चंद्र चांदणे ढगा
आडूनि प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या
लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा हि बावरी हरीची राधा हि बावरी 2
रंगात रंग तो श्यामरंग
पाहण्या नजर भिरभिरते...
ऐकून ताण विसरून भान हि वाट कुणाची बघते..
रंगात रंग तो श्यामरंग
पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून ताण विसरून भान हि वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या
लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा हि बावरी हरीची...राधा हि बावरी 2
राधा हि बावरी हरीची...राधा हि बावरी