गीत:- सांगा आज कुठे आहे, माझा R P I
गीतकार / गायक- आनंद शिंदे
सौजन्य:- अजय वीर
जर असते बाबा म्हटले असते तुम्ही केले काय,
असते बाबा म्हटले असते तुम्ही केले काय,
तुम्ही केले काय sss
सांगा आज कुठे आहे माझा RPI
सांगा आज कुठे आहे माझा RPI
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
***संगीत***
अपमानाला टाकून पाठी,
विष पचविले तुमच्याचसाठी,
अपमानाला टाकून पाठी,
विष पचविले तुमच्याचसाठी,
लाख विरोधी असताना ते,
हरलोच नाही कुठली कसोटी,
हरला डाव जिंकण्याचा शोधा रे उपाय,
हरला डाव जिंकण्याचा शोधा रे उपाय,
शोधा रे उपाय sss
हे सांगा आज कुठे आहे माझा RPI,
सांगा आज कुठे आहे माझा RPI,
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
***संगीत***
व्हारे शासनकर्ते तुम्ही उद्याचे,
पुसले अक्षर भिंतीवरचे,
व्हारे शासनकर्ते तुम्ही उद्याचे,
पुसले अक्षर भिंतीवरचे,
चार दिशेला, तोंड फिरवुनी,
होऊ नका रे भेदी घरचे,
आंधळा जणू दळतो रे कुत्रा पीठ खाय,
आंधळा जणू दळतो रे कुत्रा पीठ खाय,
कुत्रा पीठ खाय sss,
मग सांगा आज कुठे आहे माझा RPI,
सांगा आज कुठे आहे माझा RPI,
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
***संगीत***
आपले सोडून परक्यापायी,
भावाशी भाऊ करता लढाई,
आपले सोडून परक्यापायी,
भावाशी भाऊ करता लढाई,
निंदा सारी ही ऐकून घेता,
फुका मारून आपली बढाई,
थुंकी चाटल्याने सांगा पोट भरते काय,
थुंकी चाटल्याने सांगा पोट भरते काय,
पोट भरते काय sss,
सांगा आज कुठे आहे माझा RPI,
सांगा आज कुठे आहे माझा RPI,
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
***संगीत***
वदले आनंद, आल्हादाने,
याच पथाने तुजला जाणे,
वदले आनंद, आल्हादाने,
याच पथाने तुजला जाणे,
चळवळीचे अपूर्वा गाणे,
गायिले वामन, प्रल्हादाने,
तैशी तुझीशाहिरी याच पथा जाय,
तैशी तुझीशाहिरी याच पथा जाय,
याच पथा जाय sss
मग सांगा आज कुठे आहे माझा RPI,
सांगा आज कुठे आहे माझा RPI,
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
जर असते बाबा म्हटले असते तुम्ही केले काय,
असते बाबा म्हटले असते तुम्ही केले काय,
तुम्ही केले काय sss,
सांगा आज कुठे आहे माझा RPI
सांगा आज कुठे आहे माझा RPI
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
( कोरस- सांगा आज कुठे आहे माझा RPI )
***