श्री दत्तात्रेय प्रसन्न
आदी गुरुसी वंदावे ।
मग साधनं साधावे ।।१।।
गुरु म्हणजे माय बापं ।
नाम घेता हरतील पाप ।।२।।
गुरु म्हणजे आहे काशी ।
साती तिर्थ तया पाशी ।।३।।
तुका म्हणे ऐंसे गुरु ।
चरणं त्याचे ह्रदयीं धरू ।।४।।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
निघालो घेवून दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान
आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी
झुलते हळूच दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
रत्नांची आरास साज मखमली
रत्नांची आरास साज मखमली
त्यावर सुगंधी फुले गोड ओली
त्यावर सुगंधी फुले गोड ओली
झुळूक कोवळी चंदनासारखी
झुळूक कोवळी चंदनासारखी
निघालो घेवून दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
सात जन्मांची ही लाभली पुण्याई
सात जन्मांची ही लाभली पुण्याई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांतमाया मूर्ती पहाटे सारखी
शांतमाया मूर्ती पहाटे सारखी
निघालो घेवून दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
वाट वळणाची जीवाला या ओढी
वाट वळणाची जीवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळियात गंगा जाहली बोलकी
डोळियात गंगा जाहली बोलकी
निघालो घेवून दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान
आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी
झुलते हळूच दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री दत्तचरणी अर्पण
धन्यवाद