धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर
मातीवानी काळ कोनी दुधवानी पांढर
हे हे हे आहा
आहो लई साजिर दिसत्यात हो
ही गोजीरवानी हरण हो
पर माणूस लई उफराटा हो
काळ त्याच करण हो
त्याची भूक लई मोठी हो
त्याची ताणच लई खोटी हो
सूरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती
सूरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती
आईबाच्या सुखापाई बळी जाती लेकर
आईबाच्या सुखापाई बळी जाती लेकर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
मातीवानी काळ कोनी दुधवानी पांढर
हे हे हे आहा
असं पुराणात लेकरू होत हो
नाव त्याचा श्रावण बाळ हो
आंधळं आईबा बोलल हो
काशीला घेऊन चल हो
जन्म दात्यांची सेवा केली हो
दोघं दोही कड बसली हो
चालला बिगी बिगी हरणाच्या पाऊली
चालला बिगी बिगी हरणाच्या पाऊली
खांद्यावर कावड ग वाजतीया कडकड
खांद्यावर कावड ग वाजतीया कडकड
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
मातीवानी काळ कोनी दुधवानी पांढर
हे हे हे आहा
उन्ह सोस्वना उतरला हो
बघून एक झाड हो
आईबा म्हणाल हो
घषाला पडली कोरड हो
भांड घेऊन गेला पुढं हो
आला पाण्यामंदि बुडबुड हो
तिथं घडू नय ते इप्रित घडल
तिथं घडू नय ते इप्रित सारं घडल
बान आला घुसला ग काळजाच्या पातुर
बान आला घुसला ग काळजाच्या पातुर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
मातीवानी काळ कोनी दुधवानी पांढर
हे हे हे आहा
हि कथा आहे मोठी दुनियेला ठाव हो
सांगणारा सांगून गेला
उरल त्याच नाव हो
आता कलियुग आल हो
जग उफराट झाल हो
बघल तिथं दिसतया सार काळ
बघल तिथं दिसतया सार काळ
मायेचा ग झरा गेला आटलाया पाझर
मायेचा ग झरा गेला आटलाया पाझर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
मातीवानी काळ कोनी दुधवानी पांढर
हे हे हे आहा