*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं,
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं,
बाळा स्वप्नात तुला,दोन्ही डोळ्यांनी जपलं,
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं,
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं ,
पाळण्यात निजला काळजाचा तुकडा,
खुदुखुदू हसला चंद्रावाणी मुखडा,
पाळण्यात निजला काळजाचा तुकडा,
खुदुखुदू हसला चंद्रावाणी मुखडा,
हसू गालावरचं मी कसं ओठांनी टिपलं,
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं,
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं ,
अम... आ.. आ.. आ.. ला.. ला,
दुडूदुडू धावतो शोभा आली अंगणा,
बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा,
दुडूदुडू धावतो शोभा आली अंगणा,
बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा,
घरादारांत सुखाचं त्यानं चांदणं शिंपलं,
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं,
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं ,
उद्या होशील बाळा पित्यापरी तू गुणी,
दृष्ट लागेल तुला हेवा करील कुणी,
उद्या होशील बाळा पित्यापरी तू गुणी,
दृष्ट लागेल तुला हेवा करील कुणी,
भविष्यात तुझ्या माझ्या काय गुपित लपलं,
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं ,
बाळा स्वप्नात तुला,दोन्ही डोळ्यांनी जपलं,
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं ,
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं ,
माझं सोनुलं सोनुलं,माझं छकुलं छकुलं .
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*