नको देवराया, अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे
नको देवराया, अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे
नको देवराया
हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरियेले
मजलागी जाहले तैसे देवाsss
हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरियेले
मजलागी जाहले तैसे देवाsss
नको देवराया, अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे
नको देवराया
तुजविण ठाव न, दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी, विठाबाईsss
तुजविण ठाव न, दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाईsss
नको देवराया, अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे
नको देवराया
मोकलूनी आस, जाहले उदास
मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयातsssss
घेई कान्होपात्रेस हृदयात
नको देवराया, अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे
नको देवराया