मन पावसाळी वारे, स्पर्श ओलसर माती
मग सावल्या सुखाच्या अन् घट्ट बिलगून येती
ही रात ओठातली दरवळते चांदणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
तू जराशी ये उराशी, तू जराशी ये उराशी
जराशी ये उराशी
मन पावसाळी वारे, स्पर्श ओलसर माती
मग सावल्या सुखाच्या अन् घट्ट बिलगून येती
ही रात ओठातली दरवळते चांदणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
तू जराशी ये उराशी, तू जराशी ये उराशी
जराशी ये उराशी
या सावळ्या नशेची हवा गार ओघळते
लय आज देहाची अलवार विरघळते
या सावळ्या नशेची हवा गार ओघळते
लय आज देहाची अलवार विरघळते
तू सोडवून जाशी...
तू सोडवून जाशी तरी माझे गुंतणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
तू जराशी ये उराशी, तू जराशी ये उराशी
जराशी ये उराशी
या पावसाला जरा मग आर्जवे करावी
आपली तहान वेडी अर्धी-अर्धी व्हावी
या पावसाला जरा मग आर्जवे करावी
आपली तहान वेडी अर्धी-अर्धी व्हावी
मन उतू जाते...
मन उतू जाते आता असे त्याचे सांडणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
तू जराशी ये उराशी, तू जराशी ये उराशी
जराशी ये उराशी