menu-iconlogo
logo

Jai Jai Maharashtra Majha

logo
Lirik
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी आ आ आ आ

रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी आ आ आ आ

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी आ आ आ आ

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी आ आ आ आ

भीमथडीच्या तट्टांना या तट्टांना या

भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी आ आ आ आ

पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी आ आ आ आ

दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा

Jai Jai Maharashtra Majha oleh Shahir Sable - Lirik & Cover