फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाशs
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाशs
दरीखोर्यातून वाहेss (स्त्री ओs)
एक प्रकाश, प्रकाश
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाशs
रान जागे झाले सारे (पु ओs)
पायवाटा जाग्या झाल्या
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी,
संगे जागल्या सावल्या (पु ओs)
एक अनोखे लावण्य, (स्त्री ओs)
आले भरास भरासss
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाश
दव पिऊन नवेलीss
झाली गवताची पातीss
दव पिऊन नवेली
झाली गवताची पातीs
गाणी जुनीच नव्यानेs
आली पाखरांच्या ओठी..
ओs ओs ओs ओs
क्षणापूर्वीचे पालटे (स्त्री ओs)
जग उदास उदास
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाश
झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोखss
झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोखs
चांदण्याला किरणांचाs
सोनसळी अभिषेकs
चांदण्याला किरणांचाs
सोनसळी अभिषेकs
सारे रोजचे तरी हीss
सारे रोजचे तरी हीss
नवा सुवास सुवासs
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहेss
एक प्रकाश, प्रकाशss
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाश
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाश
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाश
झाले मोकळे आकाश